भाजप राष्ट्रवादीला फोडण्याचा प्रयत्न करतेय ; संजय राऊत !
दै. बातमीदार । १५ एप्रिल २०२३ । नागपुरात मविआची रविवारी वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे, असा घणाघात संजय राऊत यांन केला आहे. तसेच तपास यंत्रणांच्या दबावानं राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राऊतांनी काय म्हटलं? संजय राऊत हे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा भाजपचा डाव आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच तपास यंत्रणांच्या दबावंन राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. ‘ऐतिहासिक सभा होणार’ उद्या नागपुरात मविआची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
सभा होऊ नये म्हणून भाजप नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र उद्याची सभा ऐतिहासिक होणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत, यावरून देखील राऊत यांनी शाह यांना टोला लगावला आहे. उद्याची सभा पहाण्यासाठी ते येणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. आज संजय राऊत माजी मंत्री अनिल देशमुख यांची देखील भेट घेणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम