मुख्यमंत्री शिंदे यांना भाजपचा गुण आला नाही तर…जाधव

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ नोव्हेबर २०२२  राज्यातील शिंदे सरकारमधील मुख्यमंत्री यांच्यावर ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव यांनी चांगलीच टीका केली आहे. ते म्हणाले कि, भाजपसोबत गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपसारखे नाही, पण गुण नाही पण वाण आला अशी त्यांची स्थिती झाली आहे. त्यांनी अब्दुल सत्तारांना माफी मागायचे सांगितले. पण सत्तारांनी राजीनामा अद्याप दिला नाही त्यामुळे सत्तारांना माफी मागायला लावणे हा देखावा आहे का? असा सवालहि त्यांनी उपस्थित केला आहे.

भास्कर जाधव म्हणाले, नवनीत राणा, रवी राणांनी बेताल वक्तव्य केले पण भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आणि पक्षाने त्यांना थांबवले नाही. भाजप सुस्कृंत लोकांचा पक्ष पार्टी विथ डिफरन्स अशी बिरुदावली भाजप मिरवते पण सत्ता न आल्याने हे सर्व सोडले आहे. एकनाथ शिंदे हे भाजपसारखे नाहीत, पण गुण नाही पण वाण लागला असे शिंदेंना म्हणावे लागेल.
भास्कर जाधव म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या गटातील लोक काहीही बेताल बोलत आहे. भाजपची भाषाही विसरून चालणार नाही. जे बोलत आहेत, त्यांचे शब्द दिसत असले तरीही त्यामागे भाजपच्या कोणत्या नेत्यांचा हात आहे का हे तपासावे लागेल.

भास्कर जाधव म्हणाले, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार असेच बोलतात. हे ठरवून सुरू आहे. एक डाव आम्ही केला आता तुम्ही काही तरी करा असे चालू आहे. कालचे अब्दुल सत्तारांचे वक्तव्य निषेध व्यक्त करण्यापूर्वी नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांना माफी मागितल्याचे सांगितले जाते. पण दुसऱ्या बाजूने तेच सिल्लोडच्या सभेत स्वःतची स्तुती करतात.
भास्कर जाधव म्हणाले, अब्दुल सत्तारांचा अजूनही राजीनामा आलेला नाही, त्यामुळे त्यांना माफी मागायला लावणे हाही एक देखावा आहे. नवनीत राणा, अनिल बोंडे, कंगना राणावत बघा ज्यांनी भाजपविरोधी नेत्यांना शिव्या घातल्या त्यांना काही न् काही बक्षीस मिळाले आहे, काही न् काही पदे मिळाले आहे.

भास्कर जाधव म्हणाले, जास्तीत जास्त विरोधी नेत्यांवर टीका केली जाते त्यांना जास्तीत जास्त पदे आणि पदोन्नती दिली जाते. हा ट्रेंड सुरू झाला असून भाजपकडून हा प्रकार सुरू आहे. मशाल क्रांतिचे प्रतीक असून त्याला चिलीम म्हणून आशिष शेलार बोलत असतील तर त्यांचा आणि चिलीमचा जवळचा संबंध आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम