दीपिकाचा गोप्यस्फोट : रणवीर नव्हे तर याच्या सोबत करणार होती लग्न !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही महिन्यापासून शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटावर अनेकांनी टीका केली पण त्याचा पठाण चित्रपट हिट हि झाला आणि चिक्कार पैसाही कमविला त्यातच अभिनेत्री दीपिकावर सध्या कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन सुरु झालेला तो वाद फार काळ टिकला नाही. पठाणनं वाद निर्माण करणाऱ्यांना चांगलेच सुनावले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पठाणनं आता एस एस राजामौली यांच्या आरआरआरचे देखील रेकॉर्ड मोडले आहे. त्यामुळे दीपिका देखील लाईमलाईटमध्ये आली. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचे दीपिकाच्या बॉलीवूड करिअरमध्ये मोठा वाटा आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यात रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत या चित्रपटांची नावं सांगता येतील. आता भलेही रणवीर सिंग सोबत दीपिकानं वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली असेल मात्र एका कार्यक्रमामध्ये दीपिकानं आपल्याला त्याच्यासोबत लग्न करायचे नव्हते. असे सांगून चाहत्यांना धक्का दिला आहे.

 

दीपिकानं म्हटले आहे की, मला रणवीर नव्हे तर संजय लीला भन्साळीसोबत लग्न करायचे होते. त्याचं झालं असं बिग बॉसच्या अकराव्या सीझनच्या प्रमोशनसाठी दीपिका बिग बॉसच्या सेटवर गेली होती. तेव्हा सलमाननं तिला काही गंमतीदार प्रश्न विचारले होते. त्यावर तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. मला रणवीर सोबत डेटला जायला आवडेल. मात्र मी लग्न संजय भन्साळींशी करेल. असे दीपिकानं सांगितले होते. दीपिकाचं ते बोलणं ऐकल्यानंतर सलमाननं लगेच तिला सल्ला दिला. तू म्हणते तसं जर झालं असतं तर ते लग्न काही टिकलं नसतं. असे सांगून सलमाननं उपस्थितांची दाद मिळवली होती. संजय लीला भन्साळी यांचे वय ५९ असून ते अविवाहीत आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात एका वेगळ्या चर्चेला उधाण आले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम