“धनंजय मुंडे माझा नवरा आणि मी त्यांची बायको आहे” !
दै. बातमीदार । २४ एप्रिल २०२३ । राज्यात गेल्या काही दिवसापासून बहिण भावाचे राजकारण चर्चेत आले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नेहमीच आपल्या भाषणाने डरकाळी फोडणारे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे गेल्या काही दिवसापासून धार्मिक मंचावर एकत्रित आल्याने चर्चा रंगू लागली होती. पण आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा करुणा मुंडे यांनी हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधत करुणा यांनी सध्या राजकारणावर देखील भाष्य केले. लोकशाही संपवली जात आहे. त्यामुळे मी करुणा धनंजय मुंडेने पक्ष काढला असल्याचे देखील त्या यावेळी म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांच्यासोबत नाव जोडलं गेल्यामुळे करुणा मुंडे या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या पूर्णपणे शांत असल्या तरी अधून मधून सोशल मिडीयावरून तसेच पत्रकारांशी संवाद साधून विविध गोष्टींवर भाष्य करत असतात. “धनंजय मुंडे माझा नवरा आणि मी त्यांची बायको आहे” असं म्हणत करुणा मुंडे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील राजकारणात घाणेरडेपणा सुरू आहे. तो घाणेरडेपणा घराणेशाहीचा आणि हुकुमशाहीचा आहे. तसेच लोकशाही संपवली जात आहे. त्यामुळे मी करुणा धनंजय मुंडेने पक्ष काढला आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या. एका मराठी वृत्तपत्राने याबाबतचे (ऑनलाईन) वृत्त प्रसारित केले आहे.
धनंजय मुंडे यांच्याशी नाव जोडले गेल्यामुळे करुणा मुंडे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण शिवशक्ती सेनेची स्थापना केली असल्याचे देखील त्यांनी याआधी सांगितले होते. तसेच आगामी काळातील सर्व समाजकार्य शिवशक्ती सेनेमार्फत करणार असल्याचे देखील त्यांनी याआधी सांगितलं होत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम