खासदार डॉ श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील या साठी सर्वांनी कामाला लागा – सा.बा मंत्री ना. रवींद्र चव्हाण

बातमी शेअर करा...

बातमीदार | गुरुवार दि २१ मार्च २०२४ | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ येथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत आयोजित करण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात सर्वांना संबोधित केले. आदरणीय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना या निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून आणायचे आहेत. यासाठी सर्वांना एकत्रित काम करायचे आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात पूर्णत्वास गेलेले अनेक महत्वकांक्षी प्रकल्प, कल्याणकारी योजना, आपल्या शहरात उभ्या राहिलेल्या पायाभूत सुविधा या सर्वांची माहिती नागरीकांपर्यंत पोहचवायची आहे, यासाठी सर्वांनी जोमाने काम करा असे यावेळी सर्वांना आवाहन केले. तर येणाऱ्या दिवसात कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून येतील यासाठी सर्वांनी काम करायला हवे, असे आवाहन भाजपचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना केले. तसेच विजय हा महायुतीचा आहे. यासाठी आपल्या सर्वांना काम करायचे आहे. असेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.

या प्रसंगी शिवसेनेचे राज्य समन्वयक, प्रवक्ते नरेश म्हस्के, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, भाजपाचे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस, अंबरनाथ विधानसभा संयोजक अभिजीत करंजुले पाटील, सीभाजपा अंबरनाथ शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर यांच्यासह शिवसेना अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम