सोन्यासह चांदीच्या दरात घसरण !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ मे २०२३ ।  गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठे फेरबदल होताना दिसत आहे. सध्या लग्न मुहूर्त मोठ्या धामधूममध्ये सुरु असतांना अचानक सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता पण गेल्या चार ते पाच दिवसापासून सोन्यासह चांदीचे भावात मोठी घसरण झाली आहे. सोने आणि चांदी खरेदीसाठी आजचा चांगलाच मुहूर्त आहे.

24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत आज (19 मे 2023) 59,840 रुपये आहे आणि पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत प्रति 10 ग्रॅम 60,290 रुपयांवर बंद झाली होती. सराफा बाजारात चांदी 72,130 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर मागील व्यवहारात चांदीचा भाव 72,660 रुपये प्रति किलो होता.

सराफा बाजाराच्या माहितीनुसार मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,853 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,840 प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम पुण्यचा दर 54,853 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,840 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,853 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,840 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,853 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,840 रुपये आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम