
सोन्यासह चांदीच्या दरात होतेय घसरण !
दै. बातमीदार । ११ मे २०२३ । देशात गेल्या आठ दिवसापासून सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाली आहे. मात्र, तरी देखील सोन्याचा भाव 61 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. यासोबतच चांदीचा भावही प्रतिकिलो 76 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 61430 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 76,351 रुपये आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, मंगळवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 61533 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज (10 मे) सकाळी 61430 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी स्वस्त झाले आहेत.
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 61,185 रुपयांपर्यंत खाली आली आहे. तर 916 शुद्धतेचे (22 कॅरेट) सोने आज 56269 रुपये झालेय. तर 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 76351 रुपये झाला आहे. 999 शुद्धतेची 1 किलो चांदी मंगळवारी संध्याकाळी 76399 रुपये दरांवर होती. तर बुधवारी ही किंमत 76351 रुपये झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम