
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत जळगावची विजयी सलामी.. उत्कृष्ठ खेळाडूचा बहुमान कर्णधार अमळनेर चा अर्शद शेख याला….
अमळनेर(प्रतिनिधी)कर्णधार अरशद यांनी खेळ सुरू होण्याच्या 24 व्या मिनिटात पहिला गोल करून आपल्या जळगाव जिल्ह्याला चाल मिळवून दिली व त्याच गोलाच्या आधारावर जळगाव जिल्हा हा विजेता ठरला.
अशा प्रकारे जळगाव जिल्ह्याने बुलढाणा संघाला हरवून विजयी सलामीची नोंद केली
दुसरा सामना १६ डिसेंबर रोजी मुंबई संघाशी होणार आहे
या राज्यस्तरीय स्पर्धा पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलावर सुरू आहे
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सुद्धा जळगाव संघाचा कर्णधार अमळनेर चा अरशद शेख याला मिळालेला आहे वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे खजिनदार प्यारेलाल चौधरी यांच्या हस्ते त्यांना लागलीच हा पुरस्कार देण्यात आला
विजयी संघाचे व कर्णधाराचे फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले.
फोटो कॅप्शन
जळगावच्या अरशद शेख ला स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान देताना प्यारेलाल चौधरी व पुणे जिल्हा सचिव दिसत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम