शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मुलामुलींना मोफत प्रशिक्षणाला सुरुवात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०२ ऑगस्ट २०२२ । वाशिम येथे दि.२ केंद्रीय प्रशिक्षण संचालनालय,नवी दिल्ली यांच्याकडून मुला- मुलींना रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त व्हावा व त्यांचा तांत्रिकदृष्ट्या सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम येथे १ ऑगस्टपासून मोफत प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे. यामध्ये दु चाकी वाहनाची दुरुस्ती व देखभाल,इलेक्ट्रीशयन, ब्युटि पार्लर, फ्रीज व वातानुकूलित यंत्राची दुरुस्ती याबाबत प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी ईच्छुक विद्यार्थ्यांनी संपर्क साधुन या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन,वाशिम यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम