‘मनसेमध्ये हिंमत असेल तर हल्लाबोल’ ;अमित जानीचे प्रतिउत्तर !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ ऑगस्ट २०२३ | पाकिस्तानी महिला सीमा हैदरचे भविष्य काय असेल हे कोणालाच माहिती नाही. पण सीमा-सचिनच्या प्रेमकथेवर प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. मेरठचे रहिवासी उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानीही या दोघांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवत आहेत. ‘कराची टू नोएडा’ नावाच्या या चित्रपटासाठी लीड फेसही फायनल झाला आहे, सुप्रसिद्ध मॉडेल फरहीन फालक या चित्रपटात सीमाची भूमिका साकारणार आहे, सचिनची भूमिका कोण साकारणार हे अद्याप ठरलेले नाही. मात्र, त्या आधीच हा चित्रपट वादात सापडला आहे.

अमेय खोपकर म्हणाले होते की, ‘पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!’
अमित जानी यांनीही ‘मनसेमध्ये हिंमत असेल तर हल्लाबोल’ असे सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘मी थांबणार नाही, मी 19 ऑगस्टला मुंबईत येणार आहे. मनसेची हिम्मत असेल तर हल्लाबोल करून दाखवा.’ असे अमित जानी यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम