दै. बातमीदार । ६ डिसेंबर २०२२ । 25 वर्षांपासून ती मनोरंजन क्षेत्राचा एक भाग असलेली प्रसिद्ध टीव्ही शो ‘इमली’मध्ये शिवानी राणाची भूमिकेतून घराघरात पोहचणारी अभिनेत्री हेतल यादवच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत असताना अभिनेत्रीचा जोरदार अपघात झाला. हेतल यादवच्या कारला भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे.
हेतल रविवारी शूटिंग संपवून घरी परतत होती. तेव्हा मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. हेतलने एका मुलाखतीदरम्यान अपघाताची माहिती दिली आहे. हेतल ने सांगितले की, “मी रात्री 8:45 वाजता पॅकअप केलं आणि मी फिल्मसिटीहून घराकडे निघाली. मी JVLR महामार्गावर पोहोचताच एका ट्रकने माझ्या कारला मागून धडक दिली आणि ती बाजूला ढकलली गेली.”
पुढे हेतल म्हणाली, मी हिंमत एकवटली आणि माझ्या मुलाला बोलावले मला धक्का बसल्यामुळे मी माझ्या मुलाला अपघाताबाबत पोलिसांना कळवण्यास सांगितले.” या अपघातात अभिनेत्रीला दुखापत झाली नाही आणि ती सुरक्षित राहिली. यावर अभिनेत्री म्हणाली, “सुदैवाने मला दुखापत झाली नाही, पण तरीही मी अजून शॉकमध्ये आहे.” हेतल यादव सध्या स्टार प्लस शो ‘इमली’ मध्ये शिवानी राणाची भूमिका साकारत आहे. गेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये ज्वालाची भूमिका साकारल्यानंतर ती घराघरात प्रसिद्ध झाली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम