ठाकरेंच्या अडचणीत वाढ ; भाजप नेत्याने मुख्यमंत्र्यांना केली मागणी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ एप्रिल २०२३ ।  राज्यातील राष्ट्रवादीसह ठाकरे गटाच्या मागे लागलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च स्वत:चे १९ बंगले गायब केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि गायब झालेल्या बंगल्यांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.

कथित १९ बंगले प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च स्वत:चे १९ बंगले गायब केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून स्वत:च १५ जानेवारी २०२१ला चौकशीचे आदेश दिले. चौकशी कुणी करायची, कशी करायची, कुठे करायची, काय करायची, हे उद्धव ठाकरे यांनीच ठरवले. त्यानंतर चौकशीच्या नावाने बंगले गायब झालेल्या जागेचे फोटोसेशन करण्यात आले. आणि त्याचा अहवाल मुख्यमंत्री ठाकरे यांना देण्यात आला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणात गायब झालेल्या फाईलची आणि १९ बंगल्यांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी अशी मागणीही यावेळी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम