महाविकास आघाडीच्या मोर्चास सुरुवात ; आघाडीचे नेते दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ डिसेंबर २०२२ ।  राज्यात सातत्याने होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’  काढला आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात झाली. हळूहळू हा मोर्चा आता सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या दिशेने पुढे सरकत आहे. महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून दूर करण्याची मागणी या आंदोलनात अग्रस्थानी आहे

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, सपाचे अबू असीम आजमी, शेकापचे जयंत पाटील. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार विनायक राऊत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप मोर्चात सहभागी झाले आहेत. राज्यभरातून महाविकास आघाडीचे नेते मुंबईत दाखल झाले आहेत. ठाकरेगट, राष्ट्रवादी, काँग्रेसचे नेते कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्याचा विरोधकांनी कडाडून विरोध केला. कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणी केली.ही या मोर्चातील आग्रही मागणी आहे. शिवाय महापुरूषांचा अवमान करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राची मागणी करावी, अशीही मागणी महाविकास आघाडीची आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सध्या ऐरणीवर आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. हाही मुद्दा या महामोर्चात आहे. शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मविआची मागणी आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम