एमआयएमच्या नेत्याचे वादग्रस्त विधान : म्हणाला आम्ही तीन पत्नीना…
दै. बातमीदार । १५ ऑक्टोबर २०२२ । ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम)चा उत्तर प्रदेशमध्ये राजकीय स्पेस तयार करण्यासाठी प्रयत्नशील असलेले असदुद्दीन ओवेसी यांच्या उत्तर प्रदेश राज्याचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली यांनी वादग्रस्त विधान केले आहे. एका मेळाव्याला संबोधित करताना शौकत अली यांनी तीन लग्नांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
शौकल अली म्हणाले की, आम्ही तीन लग्न केले तरी तिन्ही पत्नींना समाजात मान देतो. इतर धर्मांची खिल्ली उडवत अली म्हणाले की, तुम्ही लग्न झाल्यानंतर आणखी तीन महिलांशी संबंध ठेवता. तुम्ही ना पत्नीला मान देता, ना संबंध ठेवलेल्या त्या इतर स्त्रियांना माद देता. आम्ही लग्न करून बायका घरात आणतो. त्यांना सन्मान देतो. तसेच आमच्या मुलांची नावे रेशनकार्डवर टाकतो, असही शौकत अली म्हणाले.
शौकत अली यांनी हिजाब बंदीच्या मुद्द्यावरही भाष्य केले. देशात कोणी काय घालायचे हे संविधान ठरवेल, हिंदुत्व नाही. मात्र भारतीय जनता पक्ष असे मुद्दे उपस्थित करून देश तोडण्याचे काम करत आहे. भाजपवर हल्लाबोल करताना शौकत अली म्हणाले की, मुस्लिमांना टार्गेट केले जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम