मनसे जिल्हाध्यक्षाला खंडणी मागत गोळीबार !
दै. बातमीदार । २२ जानेवारी २०२३ । मागील वर्षापासून पुण्यासह राज्यभरात मनसे मोठ्या ताकदीने उभा राहत असतांना कार्यकर्त्याची हवा गुल करण्यासाठी काही समाजकंटक पदाधिकाऱ्यावर हल्ले करीत आहे तर नुकतीच पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यावर कुटुंबासमोरच गोळीबार करण्यात आला आहे. राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील राहत्या घरासमोरच हा सर्व प्रकार घडला आहे. समीर थिगळे यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर थिगळे हे आपल्या राजगुरुनगरच्या सातकरस्थळ येथील घरासमोर असताना आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांचे कुटुंबिय देखील त्यांच्यासोबत होत.मी खेडचा भाई आहे, एकाला घालवलाय तुलाही माज आला आहे. तुला संपवतोच असं म्हणत पिस्तुल रोखून आरोपीने समीर थिगळे यांच्याकडे पैशाची मागणी केली त्यानंतर त्यांच्यावर कुटुंबासमोरच गोळीबार करण्यात आला आहे.
गोळीबार करणाऱ्या आरोपीवर मोक्का आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे. आरोपींकडून खंडणीची मागणी करत पिस्तुल रोखत फायरिंग केली. छातीवर फायरिंग वेळी पिस्तुल न चालण्याने अनर्थ टळला. तर दुसरा गोळी हवेत फायर करण्यात आली आहे. घटनेनंतर राजगुरुनगर पोलिसांत मिलिंद जगदाळे आणि मयुर जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खंडणी मागितल्याप्रकरणी आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम