भरधाव मालवाहू वाहनाच्या जबर धडकेत दुचाकीस्वार जखमी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ सप्टेंबर २०२२ । शहरात वाढत असलेले रस्ते अपघात अनेक शहरवासियांसाठी चिंतेचा विषय बनत असून, यामुळे कित्येक लोक जखमी होत आहेत. अशाच एका घटनेत एक भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक खडके (वय ४१, रा.जुने जळगाव) हे रविवार (दि.१८) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांचे एमआयडीसीतील ‘के’ सेक्टरधील काम आटोपून त्यांच्या (एमएच १९ एजी ५९३४) दुचाकीने घरी जात असताना रेमंड चौफुलीतील भारत गॅसकडे जाणाऱ्या रस्त्याने मालवाहू वाहन (एमएच १९ सीवाय २०९७) ने खडके यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.

या अपघातात दीपक खडके यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, त्यांना ताबडतोब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

दरम्यान, या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम