नोकर भरतीच्या एजन्सी भाजप कार्यकर्त्यांच्या ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० ऑक्टोबर २०२३

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते गेल्या काही महिन्यापासून सत्तेत सहभागी भाजप व शिंदे गटावर जोरदार टीका करीत आहे. नुकतेच ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले कि, शासकीय नोकरभरतीच्या कंत्राटीकरणावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यावर आरोप करीत आहेत. जर हा निर्णय त्यांच्या सरकारचा नसेल तर तो अंमलात आणण्याची घाई का केली, इतर कामांना दिलेल्या स्थगितीप्रमाणे याला का नाही स्थगिती दिली ? मुळात भरतीसाठी यांनी नियुक्त केलेल्या ९ एजन्सी या भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांच्या असून, त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी येथे केली.

अंबादास दानवे हे शुक्रवारी तुळजापूर व धाराशिव दौऱ्यावर होते. त्यांनी धाराशिवच्या मेडिकल कॉलेजमधील सुविधांचा आढावा घेतला. यावेळी औषधी तसेच इतर सुविधांचा पुरेश्या नसल्याचे निदर्शनास आल्याने सरकारवर त्यावरुन टीका केली. जिल्ह्यातील आरोग्यमंत्री असतानाही ही स्थिती असेल तर राज्याचे काय चित्र असेल, याची कल्पना यावी. तुळजापूर येथे नियोजित महाआरोग्य शिबीरासाठी राज्यभरातील रुग्णालयांतून औषधी मागवली जात आहेत. याला आम्ही विरोध केला आहे. अशा पद्धतीने इतरांकडील औषधी कमी करण्याऐवजी स्वतंत्रपणे निधीची तरतूद करुन घेणे गरजेचे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम