राहुल गांधी यांची योगी आदित्यनाथांवर जोरदार टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ फेब्रुवारी २०२३ । देशातील भाजपचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्धी असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आहेत, त्यांच्यावर थेट कॉंग्रेसचे राहुल गांधी यांनी आज दिल्लीत घणाघाती टीका केली आहे. गांधी आज दिल्लीतील सामाजिक सामाजिक संघटनांशी संवाद साधला.

गांधी म्हणाले कि, मुख्यमंत्री योगी धर्मगुरू नव्हे तर ठग आहे उत्तर प्रदेशात कुणीही हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या भाषेमुळे धर्मगुरू म्हणता येत नाही. केवळ भगवा घातल्यामुळे कुणी धर्मगुरू होत नाही. माफ करा. पण आदित्यनाथ कोणतेही धार्मिक नेते म्हणजे धर्मगुरू नाहीत. ते एक सामान्य ठग आहेत. भाजप उत्तर प्रदेशात अधर्माचा प्रचार प्रसार करत आहे.
राहुल यांना यावेळी यूपीतील धार्मिक वादळाविषयी छेडण्यात आले. त्यावर ते म्हणाले – उत्तर प्रदेशात धर्माचे वादळ नाही. मी इस्लाम वाचले. ख्रिश्चन धर्मही वाचला. बौद्ध धर्माचाही अभ्यास केला. हिंदू धर्माचीही मला जवळून जाण आहे. कोणताही धर्म हिंसाचार पसरवण्याचा उपदेश करत नाही. एखाद्या तपश्चर्या बंद केली की तो संभ्रमाच्या स्थितीत पोहोचतो.

काँग्रेस तपस्वींचा पक्ष आहे. भाजप व संघ याऊलट आहे. भाजप जोडो यात्रा पहिले व छोटे पाऊल आहे. भविष्यात आम्ही आणखी असे प्रयत्न करू. योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच काही वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते – “विरोधी पक्षांचे राहुल गांधींसारखे नेते भाजपचे काम सोपे करतात. ते खरेच भाजपसाठी पोषख वातावरण तयार करतात. काँग्रेस 1947 पासून देशात जाती-धर्माच्या नावाने फूट पाडत आहे.” यावेळी योगींना भारत जोडो यात्रेमुअळे राहुल यांच्या प्रतिमेला काही फायदा झाला काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले – राहुल गांधी यांनी आपली नकारात्मकता सोडली तर काँग्रेसला फायदा होईल. नकारात्मकता त्यांच्या यशावर पाणी फेरते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम