
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
दैनिक बातमीदार I १८ डिसेंबर २०२२ Iतालुक्यातील नशिराबाद येथे राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद गावातील एका भागात राहणारे १६ वर्षीय मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ती शाळेत शिकते शुक्रवार १६ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अल्पवयीन मुलगी ही शाळेत असताना गावात राहणारा प्रथमेश पाटील व दुर्वेश वाघूळदे यांनी अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर अल्पवयीन मुलीने घरी जाऊन नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी शनिवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी प्रथमेश पाटील व दुर्वेश वाघुळदे या दोघांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम