भाजपचे कौतुक करीत शिंदे गटावर संजय राऊतांचा निशाना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ एप्रिल २०२३ ।  राज्याच्या राजकारणात नेहमीच भाजप व शिंदे गटाला धारेवर धरणारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज थेट शिंदे गटावर टीका करीत भाजपचे कौतुक केल्याने राजकीय भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांनी नागपुरात झालेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूटसाठी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. राऊत म्हणाले, या रुग्णालयाविषयी मी माहिती घेतली. या प्रकल्पासाठी देवेंद्र फडणवीस यांचे मी कौतुक करतो. अशा सामाजिक कार्याची परंपरा असल्याने राजकारण्यांनी त्याकडे लक्ष द्यावे.

महाराष्ट्रात भाजपला शिंदे सरकारचे ओझे झाले आहे. आणि हे ओझे किती काळ खांद्यावर घेऊन फिरायचे हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मी चर्चा ऐकल्या आहेत, असा टोला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

संजय राऊत म्हणाले, बारसूच्या संदर्भात शरद पवार म्हणाले स्थानिकांना विश्वासात घ्या. मात्र जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. काल उद्धव ठाकरेंनी आमची भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्लीचा आग्रह असल्याने बारसूच्या जागेचा पर्याय आम्ही सूचवला होता. मात्र जनतेची इच्छा नसेल तर याठिकाणी देखील प्रकल्प नको हीच आमची भूमिका आहे. बारसूच्या आसपास ज्या ज्या परप्रांतियांनी जमिनी खरेदी केल्या आहेत. त्यांच्या हट्टासाठी प्रकल्प याठिकाणीच करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
संजय राऊत म्हणाले, ज्यांची जोडे पुसायची लायकी नाही, जनता त्यांना धडा शिकवेलच. शिवसेनेने सामान्यातल्या सामान्य माणसाला जात-धर्म आर्थिक परिस्थितीचा विचार न करता सर्वोच्च पदावर नेऊन ठेवले. जनता तुम्हाला जोडे मारणार आहे. निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल. कोण जोडे मारतेय कोणाला जोडे पुसायला ठेवले जाते कळेलच.

संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे वडिल कॅन्सरने गेले होते. त्या वेदनेतून त्यांनी नागपुरात भव्य अशे कॅन्सर इस्पितळ बनवले आहे. त्यांचे या रुग्णालयासाठी कौतुकच आहे. हा प्रकल्प शासकीय नसून सामाजिक संस्थांनी उभारला आहे. याचे आम्ही स्वागतच करतो. आम्हाला याचा गौरव आहे. यामध्ये राजकीय टीका होऊ शकत नाही. चांगले उभे केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम