देशात सिसोदियानी व संजय राऊत यांचे ट्विटरला ट्रेंड

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ ऑक्टोबर २०२२ ।   राज्यात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नंतर देशात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना समन्स आल्या नंतर सिसोदिया यांच्या अटकेची सध्या चर्चा होत आहे. सिसोदिया यांच्यावर झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर सीबीआय, ईडीकडून त्यांची चौकशी सुरू आहे.

 

आज पुन्हा सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. दरम्यान, आता सिसोदियांना अटक करण्यात येणार असल्याच्या चर्चाही सध्या देशभरात सुरू आहे. मात्र या सगळ्यात नेटकऱ्यांना संजय राऊतांची आठवण येऊ लागली आहे.

ट्विटरला ट्रेंड होणार संजय राऊत यांचं नाव याचं जिवंत उदाहरण आहे. अनेकांनी मनीष सिसोदिया आणि संजय राऊतांची तुलना केली आहे. याचं कारण म्हणजे सीबीआयने चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सिसोदिया आपल्या परिवाराला भेटले आहेत. आईला त्यांनी मिठी मारली, तिचा आशीर्वाद घेतला. तसंच सिसोदियांच्या पत्नीने त्यांना ओवाळलंही आहे. आता हेच सगळं संजय राऊतांना चौकशीला नेत असतानाही घडलं होतं. त्याचीच आठवण आता नेटकऱ्यांना आलेली आहे.

 

मनीष सिसोदियांनी संजय राऊतांची स्टाईल कॉपी केली आहे, असं म्हणत काही जणांनी याची चेष्टा केली आहे तर काही जणांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर काही जणांनी यावरुनच त्यांच्या अटकेचा अंदाज वर्तवला आहे. अशाच प्रकारे संजय राऊतही आई आणि पत्नीला भेटून गेले होते आणि त्यानंतर त्यांना थेट अटक झाली आणि आज ते तुरुंगात आहेत. उद्या तुम्हीही तुरुंगात जाल, असं काही जणांनी आपल्या कॉमेंट्समध्ये म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम