सोनिया गांधी ‘विषकन्या’ ; भाजपच्या आमदाराची टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ एप्रिल २०२३ ।  देशातील राजकारणात भाजप व कॉंग्रेसमध्ये सुरु असलेले युद्ध आता जोरदार होवू लागले आहे. एकमेकावर आरोप करीत असतांना विखारी टीका यावेळी केली जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींना ‘विषारी साप’ असं म्हटलं. त्यानंतर आता कर्नाटकचे भाजप आमदार बसनागौडा यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना ‘विषकन्या’ म्हटलं आहे.

“संपूर्ण जगाने पंतप्रधान मोदींना स्वीकारलं आहे. एकेकाळी अमेरिकेने त्यांना व्हिसा देण्यास नकार दिला होता. त्यांनी नंतर रेड कार्पेट अंथरून मोदींचं स्वागत केलं. आता ते (काँग्रेस) त्याची तुलना कोब्रा सापाशी करत आहेत आणि म्हणत आहेत की तो विष टाकेल. सोनिया गांधी विषकन्या आहे. त्यांनी चीन आणि पाकिस्तानबरोबर त्यांचे एजंट म्हणून काम केलं आहे,” असं विधान आमदार बसनागौडा यांनी केलं आहे. काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत ‘मोदी हे विषारी सापासारखे आहेत’, असे वक्तव्य केल्यानंतर या भाजपा आमदाराने हे विधान केलं आहे.

काँग्रेस प्रमुखांच्या टीकेचा मोठा विरोध झाला आणि खर्गे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर खर्गे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, “भारतीय जनता पक्ष सापासारखा आहे. जर तुम्ही चाटण्याचा प्रयत्न केला तर शेवटी तुम्ही मराल. मी पंतप्रधान मोदींबद्दल बोललो नाही. मी वैयक्तिक विधानं करत नाही. मला म्हणायचं आहे की त्यांची विचारधारा सापासारखी आहे. जर तुम्ही चाटण्याचा प्रयत्न कराल तर मृत्यू अटळ असेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम