विचित्र ट्रेंड : केस धुण्यासाठी वापरत आहेत कोका-कोला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ मार्च २०२३ । अनेक महिलांसह पुरुषांना केसांची समस्या असते त्यासाठी ते नेहमी घरगुती उपाय देखील करीत असतात, पण काही याचा फायदा झाला नाही तर ते डॉक्टरांकडून काही उपाय करत असाल पण काहीजण कांद्याच्या रसात किंवा खोबरेल तेलात लिंबू घालतात तर काही केसांना अंडी लावतात. बरेच लोक शॅम्पू बदलत राहतात आणि काहीजण केसांच्या वाढीसाठी औषधेदेखील खातात. पण तुम्ही कधी कोणाला शॅम्पू किंवा साबणाऐवजी कोका कोलाने केस धुताना पाहिलं आहे का? नक्कीच तुम्ही हे पाहिलं नसेल. मात्र मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक विचित्र ट्रेंड सुरू आहे, ज्यात असं केलं जात आहे.

केस धुण्याचा एक अतिशय विचित्र प्रकार सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. जो बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे, परंतु आपण यापूर्वी याबद्दल क्वचितच ऐकलं असेल. या ट्रेंड अंतर्गत लोक कोका कोलाने केस धुत आहेत. ज्या लोकांना कोका कोला खूप आवडतं, ते हे हॅक कधीच स्वीकारणार नाहीत किंवा त्यांच्या आवडत्या कोल्ड्रिंकचा एक थेंबही वाया घालवणार नाहीत. मात्र केसांची निगा राखण्यासाठी आणि त्यांना सुंदर करण्यासाठी काही लोक त्यांचं मत बदलूही शकतात. या पद्धतीबद्दल सांगण्यापूर्वी, आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की हा एक व्हायरल हॅक आहे.

असं कोणतंही हॅक करण्यापूर्वी, आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कोका कोलाने केस धुण्याचा सल्ला का दिला जात आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. कोका कोला आणि इतर प्रकारच्या एरिएटेड ड्रिंकमध्ये फॉस्फोरिक ऍसिड असते. त्यात पीएच पातळीचं प्रमाण खूपच कमी आहे. यामुळे त्वचेचे क्युटिकल्स कडक होतात आणि केस गुळगुळीत आणि चमकदार होतात. यासोबतच कोका-कोला केसांना वेव्ही लुक देण्यास मदत करते. हॅकमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की केस आधी कोका-कोलाने धुऊन नंतर पाण्याने धुतले तर अधिक बाउन्सी होतात. कोका कोलामध्ये साखर देखील असते ज्यामुळे केसांची घनता देखील वाढते. आता प्रश्न असा पडतो की व्हायरल हॅकमध्ये कोका-कोला वापरण्याची काय पद्धत सांगितली गेली आहे. तर, केसांवर कोका कोला टाका आणि केस चांगलं धुवून घ्या. यानंतर 10-15 मिनिटे केस असेच राहू द्या आणि नंतर कोका कोला पाण्याने धुवा, असं यात सांगण्यात आलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम