रिफायनरी गुजरातला न्या ; उद्धव ठाकरे !
दै. बातमीदार । ६ मे २०२३ । राज्यातील कोकणात सुरु होणाऱ्या रिफायनरीला येथील नागरिक प्रंचड विरोध करीत असतांना आज कोकणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा करीत येथील नागरिकाशी चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी सोलगावमध्ये रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी केली. लोकांचा विरोध असल्यास रिफायनी होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
रिफायनरीसाठी लोकांची डोकी फोडण्याचा डाव आखल्या जात आहे. मुडदे पाडून विकास होऊ देणार नाही. रिफायनरीचं समर्थन करुन दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्यकर्त्यांनी दिले आहे. मी मन की बात करायला आलो नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
रिफायनरी गुजरातला न्या आणि आमचा एअर बस, वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा. वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्रात आणि चांगले प्रकल्प गुजरातला गेले. हे चालणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. हुकूमशाहीचा विचार केला तर हुकूमशाही मोडून काढू, असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला.मुख्यमंत्र्यांची ३३ देशांमध्ये गद्दार म्हणून ओळख झाली आहे. या गद्दारांना हाराष्ट्रातील ३ जिल्हे देखील ओळखत नव्हते. समृद्धी महामार्ग होताना देखील मार्ग काढला अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा नष्ट होत होत्या, मी जाऊन मार्ग काढला, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम