ठाकरे बंधू एकत्र येणार ? मनसेने दिला युतीचा प्रस्ताव ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जुलै २०२३ ।  राज्यात गेल्या काही दिवसापासून राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु झाल्या असून आता नवीन राजकीय समीकरणं निर्माण झाली. तर राज्यात चालू असणाऱ्या राजकीय घडामोडींना स्थिरता मिळावी यासाठी ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे अशी मागणी कार्यकर्ते करू लागले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान या दोन्ही भावांनी एकत्रित यावे यासाठी मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ‘युतीसाठी मनसेकडून ठाकरे गटाला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही’ असं राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी फुट पडली त्यानंतर आता मनसेकडून हा प्रस्ताव दिल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. तर दैनिक सामनाच्या कार्यालयात अभिजीत पानसे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. त्याचबरोबर राऊत आणि पानसे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम