ठाकरे गटाची जम्बो कार्यकारिणी जाहीर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ मे २०२३ ।  राज्यातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकारीनी शिवसेनाल जय महाराष्ट्र केल्याने त्यांच्या जागी निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

यामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेले पदाधिकारी पहिल्या स्थानावर, तर तिसऱ्या स्थानावरचे पदाधिकारी दुसऱ्या स्थानावर आल्याने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात नवीन शिवसेना दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक वर्षे काम करूनही संघटनेत प्रमोशन मिळत नसल्याची भावना व्यक्त केली जात होती, ती भावना नव्या नियुक्तीमुळे भरून निघाली आहे.

शिवसेनेच्या नव्याने जाहीर केलेल्या जम्बो कार्यकारिणीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे संघटना बळकट करताना पक्षाची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोचवून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी व्यूहरचना असल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये भाजप, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीची तयारी केली आहे. त्यापाठोपाठ आता शिवसेनेनेदेखील निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

अशी आहे नवीन कार्यकारिणी
सिडको : नीलेश साळुंखे, राजेंद्र नानकर, सुनील पाटील, सचिन राणे (उपमहानगरप्रमुख), दादाजी अहिरे, रमेश उघडे, सतीश खैरनार (उपमहानगर संघटक), सुयश पाटील, राजू कदम, मयूर परदेशी (उपमहानगर समन्वयक), विष्णू पवार (विधानसभा समन्वयक), अशोक पाटील (विधानसभा संघटक), बंडू दळवी, बाळा दराडे, अजय काकडे, रवी गामणे, पवन मटाले, संदीप पाटील, प्रदीप पठाडे (विभागप्रमुख), कैलास चुंबळे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम