उपमुख्यमंत्र्यांनी दिले मंत्र्यांना आदेश !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जून २०२३ ।  राज्यात आगामी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली असतांना नुकतीच भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक बुधवारी २८ जून रोजी रात्री पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार घेण्यात आली. कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत दिल्याचं कळतं. आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचं आहे, त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा असं देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितलं.

दरम्यान राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शासकीय निवासस्थान पर्णकुटी इथे काल रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास बैठकीला सुरुवात झाली. बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारमधील भाजपच्या मंत्र्यांच्या कामाचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. सोबतच स्नेहभोजन देखील पार पडलं. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, वनमंत्री सुधार मुनगंटीवार यांची उपस्थिती होती.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मंत्र्यांना सल्ला देत काही आदेशही दिले. कामगिरी सुमार असलेल्या मंत्र्यांना कामगिरी सुधारा, असं फडणवीस म्हणाले. राज्यात महाविकास आघाडीला टक्कर द्यायची असेल तर अधिक आक्रमक व्हा. आपल्याला मिशन 45 हे लक्ष पूर्ण करायचे त्यासाठी कामगिरी अधिक सुधारा, असं त्यांनी म्हटलं. तसंच तुम्ही घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोचवा. निर्णय घेताना काही अडचणी येत असतील तर मला सांगा. आपल्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची कामे प्राधान्याने करा. जनतेत केंद्र आणि राज्य सरकारची प्रतिमा उंचवा, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या मंत्र्यांना दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम