महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी करणार विविध टप्प्यांवर आंदोलने

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी हे दिनांक 2 फेब्रुवारीपासून आपल्या विविध मागण्यांसाठी पाच टप्प्यांवर आंदोलन करणार आहेत. त्यासंबंधीचे निवेदन नुकतेच सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य एन. एन. गायकवाड यांना दिले.
महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीतर्फे केलेल्या आवाहनानुसार नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, आश्वासित प्रगती योजना पूर्ववत करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार लाभाची योजना लागू करणे, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यास मान्यता देणे, एक जानेवारी 2016 ते प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला त्या कालावधीतील थकबाकी मिळणे, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करणे अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी 2 फेब्रुवारीपासून विविध टप्प्यांवर आंदोलने करणार आहेत. यासंबंधीचे निवेदन सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी संदीप केदार, अजय देशमुख, दिलीप चौधरी, सुनील पाटील, दिलीप तडवी, राजेंद्र मराठे, प्रवीण तडवी यांनी प्राचार्यांना दिले.
परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार, लाक्षणिक संप, निदर्शने, काळ्या फिती लावून कामकाज करणे व बेमुदत संप अशा पाच टप्प्यांवर हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीतर्फे देण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम