दै. बातमीदार । १६ मे २०२३ । राज्यात लग्नसराईचे दिवस सुरु असतांना गेल्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी चढ उतार पाहायला मिळत होती. तर आता पुन्हा एकदा सोन्याच्या दराने पुन्हा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे ग्राहकांना घाम फोडला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात आज 113 रुपयांनी तेजी पाहायला मिळाली. 24 कॅरेट 10 ग्रॅमसाठी ग्राहकांना 61000 रुपये मोजावे लागणार आहेत. मंगळवारी हेच दर ६११५० रुपयांवर होते. चांदीचे दर प्रति ग्रॅम मंगळवारी हेच दर ७३३५० रुपये होते. आज हेच दर 73290 रुपये प्रति किलो दर आहेत. त्यामुळे ह्या नुसत्या वाढणाऱ्या किंमती पाहून ग्राहकांना घाम फुटला आहे.
सोनं खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडला आहे. त्यात जून अखेरपर्यंत लग्नाचे मुहूर्त असल्याने अजूनही सराफ बाजारात लग्नाच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. येत्या काळात सोनं 65 हजार रुपये 10 ग्रॅम आणि चांदी 80 हजार रुपये प्रति किलोवर दर पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम