शिंदेंच्या पैश्यावर त्यांच्या दुकानदाऱ्या सुरू ; शिंदे गटाच्या आमदाराचा घणाघाती आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ मे २०२३ ।  राज्याच्या राजकारणात शिंदेंची शिवसेना व ठाकरे गटाचे जोरदार वाक्य युद्ध सुरु आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात खंडणीखोर सरकार असून त्यांनी पैसे गोळा करण्यासाठी अनेक एजंट नेमले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या व्यक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणखी तापलं असून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांनी मातोश्रीवर पैसे दिले. संजय राऊतांसारखी लोक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर मोठे झाले आहेत, असं संजय गायकवाड यांनी म्हंटलं आहे.

राऊतांच्या टीकेवर संजय गायकवाड म्हणाले, “एकनाथ शिंदे हे पैसे वसुल करणारे किंवा खंडणी घेणारे नेते नाहीत. ते लोकांना दोन्ही हातांनी दान देणारे आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर किती पैसे दिले असतील, हे त्यांनाच माहीत नसेल. त्यामुळे संजय राऊतांसारख्या माणसाने आरोप करताना हे पाहिलं पाहिजे”. “एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पैशावरच त्यांच्या दुकानदाऱ्या सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या तुकड्यावर तुम्ही मोठे झाले आहात. आता त्यांनाच तुम्ही नावं ठेवता. एकनाथ शिंदे उदार मनाचा माणूस आहे, त्यांनी सगळ्यांना भरभरून दिलं आहे”, असं गायकवाड म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम