या अभिनेत्रीने केले असे फोटो व्हायरल अन नेटकऱ्यांना दिला सल्ला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ मे २०२३ ।  नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेले अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे कपल असतात. अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या मिताली आणि सिद्धार्थ स्पेनमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत.

स्पेन ट्रिपदरम्यान मितालीने बिकिनी परिधान करत समुद्रकिनारी फोटोशूट केले आहे. याचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. या लुकमध्ये ती फारच हॉट अंदाजात दिसत आहे. हे फोटो शेअर करत मितालाने नेटकऱ्यांना एक सल्लाही दिला आहे. “आज सकाळी उठून मी कॉन्ट्रोव्हर्सीला निवडलं. कमेंट सेक्शनमध्ये ‘आपली संस्कृती’ याबाबत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला स्वत:ची लाज वाटेल,” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. मितालीच्या हे फोटो सध्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. तर काहींनी यावर टीका देखील केली आहे.

यापूर्वी देखील मितालीने तिचा अंघोळ करतानाचा पाठमोरा फोटो शेअर केला होता. त्यामुळे देखील तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर आता तिने बिकिनीतील फोटो शेअर केल्याने काही जण तिच्यावर टीका करत आहेत. मात्र त्याआधीच तिने ‘ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नका’ असे म्हणत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम