शिवरायांचा सन्मान व्हावा, हे सांगण्याची आज वेळ आली ; उदयनराजे भोसले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ डिसेंबर २०२२ । छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खस्ता खाल्ल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी स्वराज्यासाठी वेचले, असे असताना शिवरायांचा सन्मान व्हावा, हे सांगण्याची आज वेळ येते ही शोकांतिका आहे, अशी खंत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उदयनराजेंची भेट झाली. मात्र, त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही, हा प्रश्न विचारला असता उदयनराजे भोसले यांनी बोलण्याचे टाळले.
मराठा संघटना संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि विरोधी पक्षांसह सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी मंगळवारी पुणे बंद पाळला आहे. यादरम्यान मूकमोर्चा सुरू झाला आहे. डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली, यामध्ये खासदार उदयनराजे भोसले हे देखील सहभागी झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.

पुण्यातील डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती उदयनराजे यांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर निषेध रॅलीला सुरुवात झाली. यामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मोहन दादा जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, रूपाली ठोंबरे , प्रदीप देशमुख, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, विकास पासलकर, मुस्लिम मूलनिवासी मंचाचे अंजुम इनामदार सहभागी झाले. हा मोर्चा लाल महाल येथे आल्यावर खासदार उदयन राजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला. बंदला अनेक सामाजिक, व्यापारी संघटनांचा पाठिंबा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मिळाला आहे. फेडरेशन ऑफ ट्रेडर्स असोसिएशन ऑफ पुणे (एफएटीपी) चे अध्यक्ष फतेहचंद रांका म्हणाले होते, “आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि व्यापाऱ्यांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.” सर्व दुकाने आणि कार्यालये दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम