आजचे राशिभविष्य दि २४ मे २०२३

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ मे २०२३ ।  मेष: विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न राहील. मित्र आणि भांवडाकडून सहकार्य लाभेल. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होईल. फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक वातावरण समाधानी राहिल. सुख व शांतीचे वातावरण राहिल. आपले मनोबल मनोधैर्य उचांवलेल असेल. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. मनस्वास्थ लाभेल.

वृषभ: जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास चांगले यश मिळणार आहे. अडकलेला पैसा मिळु शकेल. व्यापारात नवीन प्रस्ताव येतील. आर्थिक लाभासाठी खुप उलाढाली कराल. मुलांच्या कामाकडे लक्ष राहु दया. प्रकृतीची काळजी घ्या. महत्वाची कामे आज पूर्ण कराल. प्रेमप्रकरणात यश येईल. स्वतःला सिद्ध कराल. लेखनक्षेत्रातील व्यक्तीनी नवीन प्रस्ताव योजना मिळतील. प्रगतीकारक दिनमान आहे. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत.

मिथुन: शासनाकडून होणारे लाभ मिळतील. नोकरी व्यापारात आर्थिक प्राप्तीसाठी खुप झगडावे लागेल. स्पर्धकांच्यावर लक्ष ठेवा. हितशत्रु गुप्तशत्रूचा त्रास जाणवेल. नातेवाईकांना दुखवू नका. जोडीदाराची प्रकृती सांभाळा. तुमचे निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी बाबतीत दुर्लक्ष करु नका. आर्थिक गुंतवणुक काळजीपूर्वक करा.

कर्कः यशवी व्हाल. फायदेशीर दिवस राहणार आहे. व्यापार व्यवसाय बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम दिनमान आहे. कुंटुंबातील अडचणी दूर होतील. पत्नीशी चांगले संबंध राहतील. आखलेल्या योजना पूर्ण होणार आहेत. शुभवार्ता ऐकायला मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहिल. लाभदायक दिनमान असेल.

सिंह : आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. प्रतिष्ठित व्यक्तींशी संबंध वाढतील. संततीची प्रगती पाहून मन समाधानी राहील. परदेशभ्रमण घडेल. कामासाठी दुरचे प्रवास घडतील. कोणतेही काम जबाबदारीने करावे. व्यापारात आकस्मिक धनलाभ होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. दिनमान उत्तम राहिल.

कन्या: कुटुंबाकडून विशेष सहकार्य लाभेल. नोकरीत महत्वाची कार्य आज नक्की करा. अनुकूल यश मिळेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. शासकीय कामाच्या दृष्टीने अनुकुलता लाभेल. कोर्टाचा निकाल आपल्या लागेल. कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण लाभेल. कोणावरही अंधविश्वास बाळगु नका. भावनेच्या आधारावर कोणताही निर्णय घेऊ नका. दिनमान शुभ आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल.

तुलाः शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. कामानिमित्त घरापासून दुर जावे लागेल. जबाबदारीने कामे केल्यास भाग्याची साथ लाभेल. मित्रमैत्रिणी मध्ये स्नेह वाढेल. मन समाधानी राहिल. व्यापारात नफ्यात वाढ होणार आहे. कौटुंबिक सौख्य ही उत्तम लाभेल. दुर्व्यसनांपासून सावध रहा. प्रवास सुखकर होईल.

वृश्चिक: कुटुंबात मनमानी करू नका. विनाकारण वाद घालू नका. व्यापारात अचानक धनलाभाचे योग आहेत. व्यवहारात नम्रता व सहनशिलता ठेवा. मित्रमैत्रिणींची मदत मिळेल. अधिकारी लोकांशी नवीन संबंध जुळतील. कुटुबांतील सदस्याच्या आरोग्याबाबतीत विशेष लक्ष द्या. मानसिक स्वास्थ संभाळा.

धनु: प्रवासातून लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांना परदेशगमनाची संधी मिळेल. प्रयत्नवादी राहाल. कामे यशस्वी होतील. व्यापारात आर्थिक लाभ चांगले होतील. कलाकारांना अनुकुलता लाभेल. मुलाची विद्याभासात प्रगती होईल. शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींची प्रगती होईल. प्रवास लाभदायक ठरतील.

मकर: पत्नीकडून सहकार्य लाभेल लागेल. महिला वर्गाकडून सहकार्य मिळेल. व्यापारात नवीन योजना आखाल. उत्तम अर्थप्राप्ती होईल. सामाजिक राजकीय कार्यातून लाभ होईल. आपल्या कार्यात मग्न राहा.सफलतापूर्वक दिनमान आहे. रोजगारात व्यापार व्यवसायानिमित्त दुरवरचे प्रवास होतील. प्रवासातून लाभ होईल. संशोधनात्मक कार्य घडतील. मानसन्मान मिळेल.

कुंभ: मानसिक संतुलन ठेवा. कौटुंबिक पातळीवर कटुता निर्माण होईल. संततीविषयी चिंता निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. स्वभावात अहंकारवृत्ती वाढेल. मानीपणा टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. पत्नीच्या प्रकृतीकडे लक्ष दयावे. आरोग्याबाबतीत आर्थिक खर्च वाढेल.

मीन: आज कर्ज घेणे टाळा. व्यापारात महत्वाचा व्यवहार करू नये. कर्जप्रकरण नामंजूर होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींनी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करावेत. अंहमपणा वाढीस लागेल. मानसिक संघर्ष निर्माण होईल. दुरवरचे प्रवास टाळावेत. वाहने सावकाश चालवा. अपघात भय संभवते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम