आजचे राशीभविष्य, सोमवार १९ सप्टेंबर २०२२

बातमी शेअर करा...

 

दै. बातमीदार | १९ सप्टेंबर २०२२ | मेष – कार्यक्षेत्रात झालेला बदल स्वीकारावा लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृषभ – कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. पित्त विकाराचा त्रास संभवतो. जुन्या मित्राची भेट मन प्रसन्न करेल.

मिथुन – आपला निर्णय इतरांवर लादू नका. उच्च अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिनक्रम व्यस्त राहील.

कर्क – आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. अपचनाचा त्रास संभवतो..

सिंह – नवीन गोष्टींचे दडपण घेऊ नका. आपला आत्मविश्वास जागृत ठेवावा. मुलांच्या जबाबदार्‍या सक्षमतेने पूर्ण कराल.

कन्या – चांगल्या गोष्टींसाठी झालेला खर्च मन प्रसन्न करेल. विरोधक नामोहरम होतील. वैवाहिक जीवन सुखमय होईल.

तूळ – मनातील विचार इतरांना बोलून दाखवा. अडचणीच्या काळात मनातील व्यक्ती साथ देईल. उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होईल.

वृश्चिक – ठामपणे आपले विचार मांडाल. कोणाच्या दडपणाखाली राहू नका. आर्थिक बाजू भक्कम होईल.

धनू – तुमचा सल्ला लोक विचारात घेतील. काम अधिक वेळ ताणू नका. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.

मकर – व्यवसायिकांना अनुकूल दिवस. आर्थिक बाजू भक्कम होईल. वाहन चालवताना सावध राहावे.

कुंभ – संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. स्वत:साठी देखील वेळ काढावा. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात हित लक्षात घ्या.

मीन – कोणत्याही कामाचा तिटकारा करू नका. मनाची व्यग्रता टाळण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराचा पाठिंबा राहील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम