आजचे राशीभविष्य, सोमवार ८ ऑगस्ट २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०८ ऑगस्ट २०२२ । मेष : खर्च वाढते राहतील. संकल्पित कामे पूर्णत्वास जातील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.

वृषभ – वाचनात मन रमवावे. सामाजिक वादात लक्ष घालू नका. मन प्रसन्न राहील.

मिथुन – कौटुंबिक खर्च वाढू शकतो. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराचा सल्ला घ्यावा.

कर्क – नवीन प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करावे. कामात यथायोग्य बदल संभवतात. कौटुंबिक खर्च वाढता राहील.

सिंह – वास्तविकतेचे भान ठेवावे लागेल. पर्यटनाची योजना तूर्तास आखू नये. अतिउत्साह दाखवू नका. निष्काळजीपणा दाखवू नका.

कन्या – मनातील इच्छा पूर्ण होईल. खर्च आवाक्याबाहेर जाऊ देऊ नका. तुमचा हेतू साध्य होईल.

तूळ – घाईने निर्णय घेऊ नयेत. विनाकारण शत्रुत्व पत्करू नका. परोपकाराचे महत्त्व लक्षात येईल. नवीन विचारातून शिकायला मिळेल.

वृश्चिक – मत सौम्यपणे मांडावे. औद्योगिक वाढीसाठी धोरण बदलणे आवश्यक. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

धनू – स्वयं निर्णयावर भर द्यावा. मनोरंजनात मन रमवावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्यात भर पडेल.

मकर – जोडीदाराशी प्रेमळ वार्तालाप कराल. आपल्या उपायांचा चांगला परिमाण जाणवेल. उत्तराला प्रत्युत्तर करू नका.

कुंभ – वाढीव मेहनत करावी लागू शकते. आपल्या कामावर विश्वास ठेवावा. वरिष्ठांचे सहकार्य घ्यावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

मीन – इतरांचे मत जाणून घ्यावे. स्पर्धा जिंकता येईल. करमणुकीत दिवस घालवाल. जोडीदाराचा विश्वास संपादन कराल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम