ज्येष्ठ साहित्यिक डॉ.नागनाथ कोतापल्ले यांचे निधन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० नोव्हेबर २०२२ । राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ नागनाथ कोतापल्ले यांचं उपचारादरम्यान निधन झालंय. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. जीवन-मृत्यूशी त्यांची झुंज सुरु होती. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनावर साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
नागनाथ कोतापल्ले यांना तब्येत स्थिर नसल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र तब्येत साथ देत नव्हती. अखेर नागनाथ कोतापल्ले यांची वयाच्या 74 व्या वर्षी प्राणज्योत माळवली. नागनाथ कोतापल्ले यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राचं कधीही न भरुन निघणारं नुकसान झालंय. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा, सून आणि नातवंडं असा परिवार आहे. कोतापल्ले यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी हे प्राध्यापक ते कुलुगुरु अशी राहिलीय. नागनाथ कोतापल्ले 1977 साली मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक झाले. यांनतर कोतापल्ले यांची पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदी निवड झाली. कोतापल्ले 2005-2010 या दरम्यान मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपदी राहिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम