जळगावातील कुंटणखाना प्रकरणी गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ सप्टेंबर २०२३

जळगाव शहरातील चोपडा मार्केटमधील हॉटेल लयभारी हॉटेलमधील कुंटणखाना प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी चार जणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दि. १२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास छापा टाकला होता. या छाप्यात पाच महिलांसह चार पुरुषांना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीरा देशमुख, हवालदार सलीम तडवी रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. बनावट ग्राहक पाठवून पोलिस आत गेले. त्यावेळी मिळालेली माहिती खरी असल्याची खात्री झाली. त्या ठिकाणी पाच महिला व चार पुरुष सापडले. सहायक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेलचा व्यवस्थापक सागर अहिरे (२८, नाशिक), हॉटेल कामगार सोमनाथ पवार (२२ नाशिक), जयेश तायडे (२७,जळगाव), किरण सुरवाडे (३०, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम