आयटी कर्मचार्याची तब्बल ९१ लाखांत फसवणूक !
दै. बातमीदार । १० जुलै २०२३ । मॅट्रिमोनिअल साईटवर भेटलेल्या एका तरुणीने पुण्यातील एका आयटी कर्मचार्याची तब्बल 91.75 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. नंतर लग्न करण्याचे आश्वासन दिले. ती मुलगी त्याला म्हणाली की, लग्नापूर्वी आमच्या चांगल्या भविष्यासाठी काही पैसे तू गुंतव. यामुळे वेळोवेळी पैसा मिळत राहिल आणि सुरक्षितही राहील.
तरुणीच्या सांगण्यावरून त्या व्यक्तीने तीन वेळा तिच्या बँक खात्यात 91.75 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतरही गुंतवणुकीचा परतावा न मिळाल्याने त्याची फसवणूक झाल्याचे त्याला लक्षात आले. प्रकरण फेब्रुवारी 2023 चे आहे. गोपनीयतेमुळे आम्ही त्या व्यक्तीचे खरे नाव लिहीत नसून, सोयीसाठी बातमीमध्ये त्याचे नाव रवी असे लिहत आहोत. आदर्श नगर, देहू रोड, पुणे येथे राहणाऱ्या रवीने लग्नासाठी मुलगी शोधण्यासाठी मॅट्रिमोनियल साइटवर अकाउंट बनवले होते. इथे त्याची एका मुलीशी ओळख झाली. तो त्या मुलीशी बोलू लागला, मुलीने त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्याशी लग्न करण्याचे आश्वासनही दिले.
लग्नापूर्वी मुलीने रवीला सांगितले की तू आपल्या चांगल्या भविष्यासाठी काही पैसे गुंतव. रवीला मुलीचे म्हणणे पटले आणि त्याने पैसे गुंतवण्यास होकार दिला. रवीने आपल्या बचत आणि बँकांमधून 71 लाखांचे कर्ज घेतले आणि ते पैसे महिलेच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. आपले पैसे ब्लूकॉईन ट्रेडिंग व्यवसायात गुंतवले जात असल्याचे रवीला वाटत होते, मात्र पैसे गुंतवूनही परतावा न मिळाल्याने रवीने मुलीला परतावा का मिळत नाही, अशी विचारणा केली.
प्रत्युत्तरात मुलीने सांगितले की, आणखी 10 लाख रुपये गुंतवावे लागतील. रवीने त्याच्या गुंतवणुकीवर परतावा मिळवण्यासाठी सुमारे 3.95 लाख रुपये ट्रान्सफर केले. काही दिवसांनी त्यांनी आणखी 1.8 लाख रुपये ट्रान्सफर केले. अशाप्रकारे सुमारे 91.75 लाख रुपये मुलीला ट्रान्सफर करूनही रवीला परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर रवीने देहू रोड पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अनोळखी महिला आणि तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम