शिव जयंतीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ ; अमोल मिटकरी !
दै. बातमीदार । २१ जानेवारी २०२३ । राज्यातील राष्ट्रवादीचे नेते आ.अमोल मिटकरी यांनी मोठा गोप्यस्फोट केला आहे ते म्हणाले कि, शिव जयंतीच्या पूर्वी राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होणार हे नक्की तर या सरकारचे काउंट डाऊन सुरू झाल्याची टीका त्यांनी शिंदे व फडणवीस सरकारवर केली आहे. तर या वक्तव्यावर प्रत्युतर म्हणून प्रविण दरेकर म्हणाले कि, ‘मुंगेरी लालके हसीन सपने’ .
आमदार अमोल मिटकरी यांनी दावा केला आहे की, येत्या शिवजयंतीपूर्वी राज्यात सत्ताबदल होऊ शकतो. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यापूर्वी महिनाभरात राज्यात मोठी उलथापालथ होणार का याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
आमदार अमोल मिटकरी म्हणाले, 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करत असतो. त्यापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊन हे सरकार कोसळणार. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार येणार कि राष्ट्रपती राजवट लागणार हे सांगू शकत नाही. महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस सरकारचे आयुष्य 15 ते 20 दिवसांचे राहिले आहे.
प्रवीण दरेकर यांनी अमोल मिटकरी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. दरेकर म्हणाले, ‘मुंगेरी लालके हसीन सपने’ असेच त्याला याठिकाणी म्हणावे लागेल. संजय राऊत यांनी देखील तारखा सांगितल्या होत्या. मात्र आज सरकारला 7 महिने पूर्ण होत आहेत. प्रवीण दरेकर म्हणाले, मला वाटते त्यांनी अशाचप्रकारे भविष्य सांगत राहावे. आपले चांगले कार्यकर्ते जे शिंदे गटात किंवा भाजपमध्ये जात आहेत. त्यांना थांबवण्यासाठी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी नियोजनबद्ध स्ट्रॅट्रेजी आखत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम