रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क अभियानास चोपड्यातुन सुरुवात
चोपडा ;- पुढील महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी संपर्क अभियानास सुरुवात झाली असून चोपडा तालुक्यात या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे तसेच या संपर्क अभियानास नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिलपाटील व घनश्याम भाऊ अग्रवाल यांनी पक्षाच्या झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. रावेर लोकसभा मतदारसंघ चे जिल्हा अध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महीला प्रदेशाध्यक्ष सौ रूपाली ताई चाकणकर ,यांचे विचार सामान्य जनतेला व शेतकरी कष्टकरी आदिवासी बांधवांना यांची माहिती व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क अभियान ची सुरुवात करण्यात आली आहे
या अभियानची सुरूवात चोपडा तालुक्यातुन करण्यात आली आहे नारायण पाटील संचालक चोपडा साखर कारखाना व माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांची तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली तसेच आज पावतो 87 खेड्यात व शहरी भागातील वाड्या वस्तीवर जाऊन पक्षाचे विचार पोहचवण्यासाठी महीला जिल्हा अध्यक्ष सौ सोनाली नारायण पाटील युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया सामाजिक व न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र सपकाळे ,भुसावळ शहराचे शहराध्यक्ष संतोष चौधरी, जेष्ठ नेते प्रवीण गुजराथी ,तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष गिरीश देशमुख व युवक चे तालुका अध्यक्ष भुषण पाटील ,शहराध्यक्ष शुभम सोनवणे ,सनी सचदेव, परेश देशमुख, विनोद पाटील, रवींद्र चौधरी ,तालुक्यातील सर्व पदाधिकारी मेहनत घेऊन अजित पवार यांचे विचार सामान्य जनतेला सांगत आहेत या अभियानात महीला जिल्हा अध्यक्ष सौ सोनाली नारायण पाटील तालुका अध्यक्ष सौ सविता ताई पाटील चोपडा शहाराध्यक्ष सौ स्वाती ताई बडगुजर कार्याध्यक्ष सौ माया ताई महाजन उपाध्यक्ष सौ जयश्री ताई पाटील चहाडी सरपंच सौ चंद्रकला ताई पाटील हे घरा घरात जाऊन महीलाशी संपर्क करुन अभियानात महिलाना जोडत आहेत महीलाचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम