लग्नाआधी तरुणाई गुगलला हे शोधतात का ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ नोव्हेबर २०२२ काही प्रश्न असे असतात ज्याबद्दल मुलं खास मित्रासोबतही बोलण्यास संकोचतात. अशा वेळी त्यांना Google चा आधार मिळतो. सर्व प्रश्नांची उत्तरं देणारं आणि शंका निरसन करणारं गुगल या लग्नासाठी सज्ज असणाऱ्या मुलांचीही मदत करतो. चला तर मग, बोहल्यावर चढण्याआधी मुलं Google वर नेमकं काय सर्च करतात?
जीवनातील विवाह असा एक टप्पा आहे, जो प्रत्येक व्यक्तीच्या जगण्यालाच कलाटणी देतो. रिलेशनशिपमध्ये असणं आणि ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याच्याशीच लग्न करणं ही बाब अनेकांना सुखावह वाटते. पण, प्रत्यक्षातील अनुभव ऐकून मात्र अनेकांनाच लग्नाचा उल्लेख जरी केला तरी धडकी भरते. ज्याप्रमाणं लग्नानंतर महिलांच्या आयुष्यात अनेक गोष्टी बदलतात, अनेक तडजोडी कराव्या लागतात त्याचप्रमाणं पुरुष/ मुलांसोबतही लग्नानंतर असंच काहीसं घडतं. किंबहुना लग्न होण्याआधी मुलांच्याही मनात काही गोष्टींबाबत प्रश्नांचा काहूर माजलेला असतो.
नोकरी आणि आर्थिक गोष्टीमध्ये असणारं अस्थैर्य पाहता आपली आर्थिक बाजू लग्नानंतरही कशी भक्कम करता येईल, हा प्रश्न मुलांना सतावत असतो. या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ते गुगलचा बऱ्याचदा आधार घेतात. बचत आणि गुताविण्याचे अधिक चांगल्या पद्धतीनं कशी करता येईल हा त्यांना पडणारा प्रश्न असतो.

मी लग्नासाठी घाई तर करत नाहीये ना?
लग्नासाठी मुलं आणि मुली कितीही उत्सुक किंवा आनंदी असले तरीही आरण लग्नासाठी घाई तर करत नाही आहोत ना? हाच प्रश्न त्यांच्या मनात घर करत असतो. ज्यामुळं लग्न करण्याचं योग्य वय काय?, मी लग्नासाठी घाई तर करत नाहीये ना? असे प्रश्न मुलं गुगलला विचारतात.

ती माझ्याकडून घटस्फोट तर मागणार नाही?
गेल्या काही वर्षांमध्ये वैवाहिक नात्यामध्ये असणाऱ्या अडचणी पाहता आमचं नातं किती काळ टिकेल इथपासून होणारी पत्नी अर्थावरच साथ सोडणार नाही ना? घटस्फोट मागणार नाही ना? असे मनावर दडपण आणणारे प्रश्नही मुलं गुगलवर सर्च करतात.

परिवाराचे नियोजन केव्हा करावे ?
लग्नानंतर बऱ्याच जोडप्यांच्या बाबतीत Family Planning कधी करताय हा प्रश्न कुटुंबय सातत्यानं विचारतात असं होतं. पण, मुळात आपण या नात्यात मुलाचा विचार केव्हा करावा हा प्रश्नही मुलं लग्नाआधीच Google ला विचारतात. मुलं गुगलवर काय सर्च करणार असतील, याविषयीचे बरेच पूर्वग्रह अनेकांनी बांधलेले असतात. पण, प्रत्यक्षात मात्र ही मंडळी काय सर्च करतात हे अखेर समोर आलं आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम