सणापूर्वी सोन्यासह चांदीचे दर गगनाला !
बातमीदार | २९ ऑगस्ट २०२३
देशात गेल्या काही महिन्यापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत असतांना जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर घसरले होते. परंतु, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ झालेली पाहायला मिळाली. कालच्या सकाळच्या सत्रात सोन्या-चांदीचे भाव हे वाढले होते. जून व जुलै महिन्यात सोन्याने उच्चांकाची पातळी गाठली होती. जाणून घेऊया आजचा भाव.
आजचा सोन्याचा भाव – गुड रिटर्न्सच्या वेबसाइट्सनुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 54,600 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,550 रुपयांनी वाढ झाली होती. तर आज 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी (Gold)54,850 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 59,820 रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीचा भाव- गुड रिटन्सच्या वेबसाइटनुसार काल चांदीसाठी ७६,९०० रुपये प्रति किलो मोजावे लागला. तर आजही चांदी प्रति किलो ७,७१० रुपयांनी विकली जात आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम