हीनाला झाली दुखापत आई देखील रडू लागली ; व्हिडीओ व्हायरल !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपासून हिना खान ही सतत चर्चेत असून टीव्ही मालिकांमध्ये अत्यंत मोठा काळ हा गाजवला आहे. हिना खान हिने आपल्या करिअरची सुरूवात ऐ रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून केली. विशेष म्हणजे हिना खान हिला खरी ओळख ही याच मालिकतून मिळालीये. ऐ रिश्ता क्या कहलाता है मालिकेनंतर हिना खान हिने थेट बिग बाॅसमध्ये सहभागी झाली. बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना हिना खान दिसली. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही हिना खानची जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.

हिना खान ही नेहमीच सोशल मीडियावर देखील सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी हिना खान ही नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. हिना खान हिने काही दिवसांपूर्वीच एक खास फोटोशूट केले होते, मात्र यानंतर हिना खान ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. हिना खान रमजानच्या महिन्यात मक्का येथे पोहोचली होती.

त्यावेळी हिना खान हिने हिजाबमधील काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच हिना खान हिने बोल्ड लूकमध्ये खास फोटोशूट केले. ज्यानंतर अनेकांनी हिना खान हिच्यावर टिका करण्यास सुरूवात केली होती. हिना खान हिने वेब सीरिजमध्येही धमाकेदार अभिनय केला आहे. नुकताच हिना खान हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हिना खान हिचा हा व्हिडीओ तिच्या घरामधीलच आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हिना खान ही तिच्या घरामध्ये अत्यंत शांतपणे जात आहे आणि एक व्यक्ती मागून तिचा व्हिडीओ काढत आहे. या व्हिडीओमध्ये हिना खान हिच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसत आहे.

त्यानंतर हिना खान ही घरात गेल्यावर शांतपणे सोप्यावर जाऊन बसते आणि तिच्या आईला आवाज देते. हिना खान हिला पाहून तिच्या आईला खूप जास्त आनंद होतो आणि ती हिनाला गळ्याला लावते. हिना खान आपल्या आईला सरप्राईज देताना दिसत आहे. इतकेच नाही तर हिना खानला पाहून तिची आई ढसाढसा रडण्यास देखीस सुरूवात करते. हिना खान आईला म्हणते की, मला त्रास होत आहे. त्यानंतर हिना खान सोप्यावर बसते. हिना खान हिची आई पायाला काय झाले हे विचारताना दिसत आहे. आता हिना खान हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत हिना खान हिला विचारले आहे की, तुझ्या पायाला काय झाले. इतकेच नाही तर बऱ्याच लोकांनी हिना खान हिला काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. आता हिना खान हिचा हाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिना खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम