‘पुरूषांनो माझ्यापासून थोडं दूर रहा ; दुबईहून येताच राखी संतापली !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ सप्टेंबर २०२३ | गेल्या अनेक महिन्यापासून राखी सावंत हि वेगवेळ्या कारणाने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी ही पहिला उमराह करून भारतात परतली आहे. तिचं सोशल मीडिया अकाऊंट देखील तेथील फोटो आणि व्हिडीओ यामुळे भरलेले आहे. आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखी सावंत हिने इस्लाम धर्म स्वीकारला. एवढेच नव्हे तर तिने तिचं नाव राखी नव्हे तर फातिमा असल्याचं देखील जाहीर केलं. आता तिचा एक नवा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये ती चांगलीच भडकलेली दिसत आहे.

खरंतर या व्हिडीओमध्ये राखीचा अंदाज पूर्णपणे बदललेला दिसत आहे. उमराहसाठी राखीने भारत सोडला अन् तिचा पोशाख पूर्णपणे बदलला. राखी उर्फ फातिमा ही आता पूर्णपणे मुस्लिम धर्माचे पालन करताना दिसत आहे. तिचा केवळ पेहरावच नव्हे तर बोलण्याची पद्धतही बदलली आहे. या नव्या व्हिडीओमध्ये राखी ही लाल रंगाच्या बुरख्यात दिसत असून ती आजूबाजूच्या पुरुषांना सल्लेही देताना दिसली.
‘पुरूषांनो माझ्यापासून थोडं दूर रहा, मला हे सगळं आवडतं नाही’ असं राखी यात म्हणताना दिसली. पण महिलांशी ती अतिशय प्रेमाने वागताना दिसली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये राखी लोकांना उत्तर देता देताच पुरूषांवर भडकलेली दिसली. ती म्हणाली, ‘ पुरूषांनी , मला हात लावू नका. जरा तरी लाज बाळगा. दूर रहा माझ्यापासून’ अशा शब्दांत तिने आजूबाजूच्या लोकांना फटकारलं. या व्हिडीओमध्ये राखीचा बदललेला अंदाज स्पष्टपणे दिसत आहे.तिचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम