बाजारातून घेवून या टोमॅटो भावात झाली घसरण !
दै. बातमीदार । १८ जुलै २०२३ । गेल्या काही दिवसापासून देशात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झालेली होती. टोमॅटोचा दर प्रति किलो दीडशे रुपयांच्या पार पोहोचल्यानं सर्वसामान्य लोकांच्या आहारातून टोमॅटो गायब झाला आहे. टोमॅटोचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे मात्र पुण्यातून दिलासादायक बातमी समोर येत आहे.
घाऊक मार्केटमध्ये टोमॅटोचे दर प्रति किलोमागे वीस रुपयांनी कमी झाले आहेत. पुणे मार्केट यार्डमध्ये काल-परवापर्यंत टोमॅटोला प्रति किलोमागे 100 रुपयांपेक्षा अधिक दर मिळत होता. मात्र आज टोमॅटोचे दर हे प्रति किलो 80 ते 90 रुपयांवर आले आहेत. किरकोळ बाजारात दर कायम मात्र जरी घाऊक बाजारात टोमॅटोचे दर कमी झाले असले तरी देखील अद्याप किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर जैसेथे आहेत.
पुण्यातील किरोकळ मार्केटमध्ये टोमॅटोला प्रति किलो 120 ते 140 रुपये एवढा दर मिळत आहे. टोमॅटोची आवक वाढत असून, येत्या काही दिवसांत टोमॅटोचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. काकडीचे दर घसरले दरम्यान एकीकडे टोमॅटोचे भाव वाढत आहेत, मात्र दुसरीकडे काकडीचा भाव कमी झाला आहे. कवडीमोल किंमतीनं काकडी विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोसोबतच इतर काही भाजांना देखील सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम