आजचे राशीभविष्य, सोमवार ११ जुलै २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ११ जुलै २०२२ | मेष:-

कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. काही प्रमाणात मानसिक तणाव राहील. अति विचारांच्या आहारी जाऊ नये. संपर्कातील लोकांच्या वैचारिकतेचा अति विचार करू नका.

वृषभ:-

कला क्षेत्रात संधी मिळू शकेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. मैत्रीचे संबंध जपावे लागतील. नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल.

मिथुन:-

कामाच्या व्यापाने थकून जाल. मनात विचारांचा गोंधळ माजेल. क्षणिक आनंदाने हुरळून जाऊ नका. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

कर्क:-

वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. मानसिक स्थैर्य जपावे लागेल. लहान-सहान गोष्टींचा फार ताण घेऊ नका.

सिंह:-

कौटुंबिक गोष्टींना अधिक प्राधान्य द्यावे. वात विकारांचा त्रास जाणवेल. मानसिक चंचलता राहील. ध्यानधारणेत अधिक वेळ घालवा.

कन्या:-

मनातील काही आकांक्षा पूर्ण करून घ्या. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. अधिकारी वर्गाचे उत्तम सहकार्य मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींना चांगला प्रतिसाद मिळेल.

तूळ:-

वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल. तरच काही गोष्टी साध्य करता येतील. प्रतिष्ठित व्यक्तींची गाठ पडेल. चांगला आर्थिक लाभ होईल.

वृश्चिक:-

सकारात्मक विचाराने वागावे. व त्याच दृष्टीने कौटुंबिक प्रश्न हाताळावेत. आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे. शांततेने गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा.

धनू:-

कौटुंबिक बाबींकडे अधिक लक्ष द्यावे. घरातील वातावरण तप्त राहील. मानसिक चिंतेने ग्रासले जाऊ शकता. जोडीदाराशी वादाचे प्रसंग टाळावेत.

मकर:-

एकमेकातील समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल. मनातील एखादी जुनी आशा पूर्ण होईल. जोडीदाराच्या मताचा आदर करावा.

कुंभ:-

संयमाने वागावे. आततायीपणे केलेले काम त्रासाला कारणीभूत ठरेल. जोडीदाराच्या मताशी भिन्नता निर्माण होईल. फार तिखट पदार्थ खाणे टाळावे.

मीन:-

क्षुल्लक गोष्टींवर रागराग करू नका. नातेवाईकांशी संयमाने वागावे. धाडसी निर्णय सारासार विचार करून घ्यावेत. हातातील कलेला वाव द्यावा.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम