वज्रमूठ सभा आता मंगल कार्यालयात घ्यावी लागले ; राणेंनी महाविकास आघाडीला डिवचल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २ मे २०२३ ।  मुंबईत काल झालेल्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडली. त्यावर भाजप नेते नितेश राणे यांनी टीका केली आहे. संजय राऊत याच्या मालकाने लहान मैदानात सभा घेतली. उद्धव ठाकरेंनी काल जी सभा घेतली ती पाहता, पुढची सभा मंगल कार्यालयात घ्यावी लागेल, असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला.

कालच्या सभेत अल्पसंख्याक लोक अधिक होते. त्याना टोप्या घालून बसवण्यात आले. त्यामुळे निवडणुकीत मराठी आणि हिंदू जनता तुम्हाला तुमची जागा जागा दाखवून देतील. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नाका खालचा मतदारसंघ राखता आला नाही आणि म्हणतात आमचाच विजय होणार, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला. ज ही माझी चौथी पत्रकार परिषद आहे. माझ्याकडे अजून बरीच माहिती आहे. आदित्यचे नाईट लाईफचे व्हिडीओ माझ्याकडे असून ते लवकरच बाहेर काढेन. तुम्ही सातत्याने आमच्या पक्षावर आणि नेत्यावर टीका करता मग आम्ही गप्प बसणार नाही. उद्धवजी, संजय राऊत या शकुनी मामाला गप्प करा. नाहीतर राज्यात तुम्हाला आणि आदित्यला फिरता येणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.

राणे यावेळी म्हणाले, “काल उद्धव ठाकरे आणि अजित दादांनी माझ्या पत्रकार परिषदांचा उल्लेख केला. तसे म्हटले तर अजितदादांना सगळं माफ आहे. ते करमुक्त आहेत. म्हणून त्यांच्यावर कुठलीही टीका करणार नाही. पण उद्धवजींना मी सांगेन, तुमच्यावर कोणी काही बोललं तर तुम्हाला झोंबतं. तुम्ही मग लोकांना तीनपाट म्हणता. मग तुमच्या सकाळच्या भोंग्याचं काय? हा माणूस (संजय राऊत) काही वर्षांपासून रोज सकाळी आमच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका करतो ते तुम्हाला इतक्या वर्षात दिसलं नाही का? ही माझी केवळ चौथीच पत्रकार परिषद आहे. आता पुढच्या पत्रकार परिषदांमध्ये आणखी वाभाडे काढणार, असा इशाराही नितेश राणेंनी दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम