कारण नसताना भाजपने संजय राऊतांना जेलमध्ये टाकले – शरद पवार
दै. बातमीदार । १९ सप्टेंबर २०२२ । शिवाजी पार्क म्हटल की शिवसेना हेच समीकरण आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. शिवाय कारण नसताना भाजपने खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरू असताना त्यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले कि, मुख्यमंत्री शिंदे यांना देखील दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. शिंदे गटाला मेळावासाठी बीकेसीचे मैदान देण्यात आले आहे.
खा. संजय राऊत यांच्यांकडे ठाकरे आणि शरद पवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपचे नेतेमंडळी करत आहेत. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना जेलमध्ये टाकण्यात आले. भाजपवाल्यांनी त्यांना जेलमध्ये टाकले आणि आता आम्हाला सांगयेत की, आम्ही वाऱ्यावर सोडले. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम