मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनींची रुग्णालयात घेतली भेट
ठाणे – धर्मवीर आनंद दिघे यांच्या ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची तब्येत बरी नसल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अरुणाताईंच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून तब्येत आणि औषधोपचारांची माहिती घेतली. तसेच अरुणाताईंवर शक्य ते सर्व उपचार करण्याचे आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होण्याचे प्रयत्न करण्याची विनंती डॉक्टरांना केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम