प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या मातोश्रीचे निधन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ ।  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज वाजपेयीच्या आई गीता देवी यांचे निधन झाले आहे. त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांचे वय ८० वर्षे होते. आज गुरुवार ८ डिसेंबर रोजी दिल्ली येथे त्यांची प्राणज्योत मालवली.

गीता देवी गेली दिवस आजाराने ग्रस्त होते. दिल्लीतील पुष्पांजली मेडिकल सेंटर या रुग्णालयात त्यांना दाखल देखील केले होते. परंतु तब्येतील सुधारणा झाल्याने त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले. त्यांच्यावर घरातच औषधोपचार सुरू होते, परंतु अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्याच वर्षी मनोज वाजपेयी यांच्या वडिलांचे निधन झाले होते. आता त्यांच्या आईचेही निधन झाल्याने वाजपेयी यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मनोरंजन विश्वामध्ये मनोजने आजवर अनेक नावीन्यपूर्ण भूमिका करून मोठी लोकप्रियता मिळवली आहे. वेब सिरिजच्या दुनियेत तर त्याचा हात कुणीही धरू शकत नाही. त्याला पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘सत्या’ मधला भिकु म्हात्रे ते आताचा फॅमिली मॅन अशा त्याच्या सगळ्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. आज त्याच्या आईचे निधन झाले असून त्याने मोठा आधार गमावला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम